Jugaad video : Unique AC Installation on Truck Goes Viral


Viral Jugaad Video : सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इतके भन्नाट जुगाड करतात की आपण विचारही करू शकत नाही. काही जुगाड आयडिया थक्क करणाऱ्या असतात. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्या संबंधित आणि उन्हापासून संरक्षण कसे करायचे, अशा टिप्स सांगणारे अनेक जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क ट्रकमध्ये एसी लावलेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सहसा चारचाकी कारमध्ये एसी असतो पण तुम्ही कधी ट्रकमध्ये लावलेला एसी पाहिला आहे का? या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क ट्रकमध्ये एसी लावला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका एसी कसा लावला आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

चक्क ट्रकमध्ये लावला एसी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ट्रक दिसेल. हा ट्रक पूर्णपणे काचबंद आहे. या ट्रकच्या पुढील आणि मागील चाकाच्या मध्ये एसीचे आऊटडोअर युनिट लावले आहे. हे युनिट उष्णता बाहेर टाकण्यासाठी, हवा खेळती ठेवण्यासाठी, एसी व्यवस्थित काम करण्यासाठी आणि एसीचे आयुष्य वाढवण्यासाठी काम करते. ड्रायव्हर सीटच्या मागे एसी लावलेला व्हिडीओत तुम्हाला दिसेल. हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कोणी विचारही केला नसेल की अशा पद्धतीने ट्रकमध्ये एसी लावू शकतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “गाडी मालक असावा तर असा, चक्क ट्रकमध्ये एसी लावली आहे. का डोकं लावलय”

हेही वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा

yogiraj_goli_9 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बघा तुम्ही पण् चक्क ट्रक मध्ये एसी” एका युजरने लिहिलेय, “नाद करा पण ट्रक ड्रायव्हरचा कुठं” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान पद्धतीने एसी बसवला आहे. या गाड्या खुप लांबचा प्रवास करत असतात त्यामुळे याची खरच गरज आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशिबवान चालक आणि उदार मालक” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *