अंबाजोगाईच्या योगेश्वरी पॉलिटेक्निकचा अभिनव उपक्रम, निकालापूर्वीच विद्यार्थी कंपनीत रुजू
तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पॉलिटेक्निक मधील 40 विद्यार्थी तृतीय वर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच, नगर येथील नामांकित M-INDIA व नाशिक येथील बॉश कंपनीत रुजू होणार आहेत. योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील शेवटचा पेपर दिनांक 30 मे 2025 रोजी…